पुणे : साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्यात कारला सोमवारी (ता. ३०) पहाटेच्या सुमरास भीषण अपघात झाला असून यात पुण्यातील सराफ कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पुण्यातील सराफ कुटुंबीय गोकर्ण, महाबळेश्वरची ट्रीप संपवून पुन्हा पुण्याला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सातारा जिल्ह्यातील शिरवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.