राहुलकुमार अवचट
यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाखारी गावच्या हद्दीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक व कारची समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक पती गंभीर जखमी झाला आहे. हि घटना ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वाखारी गावच्या हद्दीतील शेळके वस्ती येथे घडला.
सारिका शिलवंत गायकवाड (वय-४० रा. हातोसी, ता. निलंगा, जि. लातुर) असे अपघात मृत्यू झालेल्या महिलेचं नववा आहे, तर कारचालक पती शिलवंत शांतकुमार गायकवाड हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखारी गावच्या हद्दीतील शेळके वस्ती येथे बल्कर ट्रक (क्र. एम. एच. १२ व्ही. एफ २४०१) आणि कारची (एम. एच. १२ क्यू. जी ५७२६) समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात कारचालक शिलवंत गायकवाड हे गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी सारिका गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, गंभीर जखमी झालेले कारचालक शिलवंत गायकवाड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस नाईक व्ही. डी. कापरे यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मटाले करत आहेत.