यवत(पुणे): पुणे जिल्ह्यातील देलवडी येथील प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा देवस्थान भक्तनिवास बांधकामाबाबत गावातील रहिवासी संदीप वाघोले हे 15 एप्रिल पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणार असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी व यवत पोलीस स्टेशन येथे दिले आहे.
मंजूर जागेवर भक्तनिवास बांधकाम करावे
देलवडी येथील श्री खंडोबा देवस्थान यांना मंजूर झालेल्या भक्तनिवास बांधकाम कामकाजात ग्रामपंचायत यांनी मनमानी करून देवस्थानाला विचारात न घेता नियोजित मंजूर जागेऐवजी अन्य गैरजागेत भक्तनिवास बांधकाम केले असून यातील दोषी अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी, दोषींकडून सदर बांधकाम रक्कम वसूल करून देवस्थान हद्दीत मूळ मंजूर जागेवर भक्तनिवास बांधकाम करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुनावणी होऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रशासनाविषयी निराशा व नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक, यांच्यावर कारवाई न झाल्याने प्रशासनावरील विश्वास कमी झाला असल्यामुळे 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ग्रामपंचायत देलवडी कार्यालयाच्या आवारात अन्नत्याग उपोषणास बसणार आहे.
-संदीप वाघोले, ग्रामस्थ
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी अशोक लोणकर यांच्याशी संपर्क केला असता याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात कोणतेही उपोषणाबाबत पत्र मिळाले नसल्याचे सांगितले .