राहुलकुमार अवचट/ यवत ( पुणे ) : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. सदर योजनेची अंमलबजावणी पुणे जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार राज्यात दि.०१ ते ०७ डिसेंबर २०२३ या कालावधीत पिकविमा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज मळद तालुका दौंड येथे फसल बीमा पाठशाळा घेण्यात आली. यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी शनिदेव जाधव यांनी योजनेबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
आंबिया बहार सन २०२३ मधील आंबा या फळपिकासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याची तारीख दि.३१ डिसेंबर २०२३ अशी असून डाळिंब या पिकासाठी अंतिम तारीख दि. १४ जानेवारी २०२४ अशी आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी – शनिदेव जाधव यांच्या कडुन आवाहन करण्यात आले आहे.
तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे पुणे जिल्हा समन्वयक राहुल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली फसल बिमा पाठशाळा संपन्न झाली यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.