युनूस तांबोळी
Farmer News | शिरूर : यंदा ज्वारीची पेरणी कमी झाल्याने ज्वारीसह कडब्याच्या दराने या वर्षी उंच्चाकी दर गाठला आहे. कडब्याच्या दरात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कडब्याला शेकडा अडीच ते साडेतीन हजार रूपयांचा दर आला आहे.
दरम्यान शिरूर तालुक्यातील जिरायत भागात ज्वारीचे पिक घेण्याकडे शेतकर्यांचा कल असतो. फक्त घरच्या खाण्यापुरते ज्वारीचे पिक घ्यायचे. त्यातून या पिकाऐवजी ऊस, कांदा, बटाटा, वांगी व अन्य भाजीपाला पिकांची लागवड वाढल्याने ज्वारीची पेरणी कमी झाली आहे.
यंदा ज्वारीचे दर गगणाला भिडले आहे. बाजारपेठेत तब्बल साडेचार हजार रूपये प्रतीक्विंटल दराने ज्वारी विकली जात आहे. यंदा गहू तीन ते साडेतीन हजार रूपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. ज्वारी, गहू पेरणी क्षेत्र कमी झाल्याने यंदा दराने उच्चांक गाठल्याने आनंदाचे वातावरण आहे. मात्र ज्वारीची पेरणीच झाली नसल्याने शेतकऱ्यांकडे ज्वारीचे उत्पादन नसल्याचीही खंत शेतकरी करू लागला आहे.
उन्हाळा वाढला की शेतात हिरवा चारा संपू लागतो. अशा काळात ज्वारीच्या कडब्याला अधिक मागणी असते. एरवी शेकड्यामागे दीड हजाराचा दर होता. मात्र शेकड्याचे तेच दर सध्या अडीच हजारांवर पोहचले आहेत. उत्पादकाला सुगीचे दिवस आले असले तरी खरेदादार शेतकरी हवालदिल झाला आहे.
कडबा टंचाई ची जाणिव…
कडबा टंचाई ची जाणिव शेतकऱ्यांना झाली आहे. एका पेंडीला २५ रूपये मोजावे लागत असल्याने शेकड्याला २ हजार ५०० रूपये मोजावे लागत आहे. ज्वारी हे पिक आहारासाठी उत्तम आहे कडबा हा चारा म्हणून वापरला जात असल्याने शेतकरी वर्गाने हे पिक घेतले पाहिजे. अशी भावना शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.
कडब्याला चांगले दर मिळू लागल्याने पेरणीपासून मळणीपर्यंतचा खर्च निघून जाणार असल्याने उत्पादकात समाधान आहे. पाणि व्यवस्थापन व ऊसाचे वाढलेले क्षेत्र यामुळे ज्वारीच्या पेरणीत घट झाली आहे.या वर्षी शिरूर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. त्याचा ही परिणाम चारा खरेदीवर झाला आहे.
ए. बी. जोरी कृषी सहाय्यक कृषी विभाग शिरूर
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Farmer News | शेतकरी चिंतेत ! कडब्याच्या दरात वाढ, दुधाचा प्रतिलिटर निर्मिती खर्च वाढणार
Farmer News : अखेर शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश..! सरकारने सर्व मागण्या केल्या मान्य
Ajit Pawar | पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं, राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला ; अजित पवार