युनूस तांबोळी

पुणे: भुमीअभिलेख कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चुकीच्या मोजणीचा फटका शेतकरी कुटूंबाला बसला असून लवळे ( ता. मुळशी ) येथील शेतकरी अरूण भिकोबा राऊत हे आमरण उपोषणासाठी गेली १४ दिवस लढा देत आहेत. शेतकरी गेल्या १४ दिवसापासून न्याय हक्कासाठी लढा देत असून उपोषण सुरू असल्याने शेतकरी गरीब कुटूंबाला न्याय कधी मिळणार या बाबत मुळशी तालूक्यात चर्चा सुरू झाली आहे.
९ जून रोजी सुरू झालेल्या या उपोषणात त्यांच्या समवेत आई सिंधुबाई, आत्या कमल बाळसराफ, पत्निमिना, मुलगी रूपाली कुदळे, जावई संदिप कुदळे, मुलगा तुशार, सून वृषाली, नातू सौम्या, धानुष, वैभवी, चुतलभाऊ सोमनाथ, दत्तात्रेय, मंदा सातव, आदी तेरा दिवसापासून उपोषाणाला बसले आहेत. गेल्या १४ दिवसात अरूण राऊत यांनी अन्न आणि औषधांचा त्याग केला असून त्य़ांची प्रकृती चिंताजनक आहे. मुळशी तालुक्यातील लवळे येथील शेतजमिनीची काही वर्षापुर्वी मोजणी झाली होती. २००६ साली वोट कमिशनची झालेले मोजणी डावलून दुसऱ्या हद्दी देताना माझ्याकडचे असणारे सरकारी पुरावे पाहिले जात नाहीत. मला उलट उत्तर दिली जातात.

2006 साली हेमंत निगडे ह्या मोजणी अधिकाऱ्याने जाणून बुजून माझे घर दुसऱ्याच्या गटात दाखवलेले आहे. त्याच्यासाठी मी आज 1४ महिने लढा देतो आहे. हे तिसरं उपोषण चालू आहे. त्यावेळी भुमीअभिलेख कार्यालयाने शेतीच्या गटाचा हद्दीवर शेतकऱ्याचे घर दाखविले. परंतू हे घर तेथे नसून काही अंतरावर आहे. असे राऊत यांनी सांगितले.
त्या काळात मोजणी अधिकाऱ्याने हद्दीच्या चुका केल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरूद्ध निकाला दिला होता. सरकारी नकाशात या जागांच्या हद्दी अगदी सरळ दाखविण्यातआल्या आहेत. मात्र मोजणी अधिकारी मनमानी करून या हद्दी चुकीच्या दाखवित आहेत. असे राऊत यांनी सागितले. “मागील काळात जो नकाशा आणि हद्द अस्तित्वात आहे. त्या प्रमाणे मोजणी करावी” अशी मागणी राऊत करत आहेत. या बाबत भुमीअभिलेख जिल्हा अधिक्षक प्रभाकर मुसळे यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन राऊत यांना तपासणी करून निर्णय घेऊ असे सांगितले. दरम्यान एकाच जागेची चार वेळा मोजणी करून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रती देण्यात आल्या. त्यामुळे या मोजणीत काहीतरी गडबड असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोजणीत पारदर्शकता आणून या कुटूंबाला न्याय मिळावा अशी सरपंच विनायक गुजर यांची मागणी आहे.
“शेतकरी अरूण राऊत यांच्याशेत जमिनीची याअगोदर मोजणी करण्यात आली आहे. राऊत यांना ही मोजणी मान्य नसल्याने भोर येथील भुमि अभिलेख कार्यालयात वर्ग करण्यात आली आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारी कागद पत्रांची तपासणी करून निर्णय घेतील.”
-स्वप्ना पाटील उपअधिक्षक भुमी अभिलेख मुळशी“संबधित मोजणी ही पारदर्शकपणे भुमीअभिलेख खात्याने करावी. गेल्या काही काळातला चुकीचा निर्णय या कार्यालयाने मान्य करावा. योग्य असा निर्णय देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्यातून भविष्यात कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. अशी योग्य कायदेशीर पाहणी करून निर्णय घ्यावा.”
– अरूण राऊत उपोषण कर्ते लवळे ( ता. मुळशी )







