मुंबई: मुंबईतुन धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या नराधमाने अत्याचार करत व्हिडिओ देखील शूट केला होता. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीसह प्रेयसीविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून २४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व भागात घडली आहे. येथे दहा वर्षीय मुलीवर तिच्या आईच्या प्रियकराने वारंवार अत्याचार केला. घरात कुणीही नसताना आरोपी तिच्या घरी जाऊन चिमुकलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करायचा. एवढंच नाही तर या नराधमाने अत्याचार करून चिमुकलीच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर घातला.
‘तुझ्या आईला जीवे मारून टाकीन’, अशी धमकी देत नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला. अखेर त्रास असह्य्य झाल्यानंतर तिने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला.

दरम्यान, या घटनेनंतर महिलेनं मेघेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रियकराविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून २४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.







