Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतातून जाण्यास अडविल्याने शेतकऱ्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 6 August 2025, 17:27

लोणी काळभोर, ता. 6 : शेतामधुन जावु नका, पिकांचे नुकसान होत आहे असे समजावुन सांगत असल्याचा राग मनात धरून 6 जणांच्या टोळक्याने एका शेतकऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना तरडे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 248 मध्ये 31 जुलै 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. तर 6 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणीत अंकुश रामभाऊ बरकडे (रा. तरडे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर शिवाजी राघु गडदे (वय 50), लक्ष्मण राघु गडदे (वय-55) रामभाऊ राघु गडदे (वय 45) बबन लक्ष्मण गडदे (वय 26 ) श्रीकांत लक्ष्मण गडदे (वय 19 ) दत्ता रामा गडदे (वय – 21, सर्व रा.तरडे ता. हवेली जि. पुणे.) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मनिषा अंकुश बरकडे (वय-30, रा. तरडे, ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा व त्यांचे पती अंकुश बरकडे हे कुटुंबासोबत तरडे परिसरात राहतात. अंकुश बरकडे यांच्या नावावर तरडे गावातील गट नंबर 248 मध्ये 100 आर ऐवढे क्षेत्र आहे. त्यांच्या शेतीलगत गट नंबर 249 असुन सदर गटामध्ये आरोपींचे क्षेत्र आहे. त्यांच्या शेतजमिनीमध्ये जाण्या-येण्याकरीता रस्ता नसल्याने ते फिर्यादी यांच्या शेतजमिनीमधुन जाणे-येणे करीत आहेत.

आरोपी शेतीमधून वारंवार जात असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या पतींनी शेतातून जावू नका. असे यापूर्वीही समजावुन सांगितले होते. त्यावेळी आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी व हाताने मारहाण केली होती. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.

 

दरम्यान, फिर्यादी मनिषा यांचे पती अंकुश बरकडे हे शेतात बकरी चरण्यासाठी गेले होते. तेव्हा अंकुश बरकडे यांनी आरोपींना शेतातून जावू नका असे सांगितले. शेतातून जाण्यास अडविल्याचा राग मनात धरून आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी, लाकडी दांडक्याने व लाथा बुक्यांनी अंकुश बरकडे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अंकुश बरकडे हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी मनिषा बरकडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 190, 191(2), 191(3), 329(3), 115(2), 351 (2) (3) 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय! ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

Tuesday, 6 October 2026, 23:00

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12
Next Post

'खालिद का शिवाजी' चित्रपटावर बंदी घालावी: महंत, विचारवंत आणि व्याख्यात्यांची सरकारकडे मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp