युनूस तांबोळी
शिरूर, (पुणे) : हवामान खात्याच्या अंदाजानूसार परतीचा मान्सूम अंतीम टप्प्यात जोरदार बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परतीच्या पावसात ‘उत्तरा’ हे पावसाचे नक्षत्र जोरदार बरसले. यापुढे ‘हस्त’ हे बेडूक वाहन असून हे नक्षत्र जोरदार बरसण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. २७ सप्टेंबर सुरू झालेल्या ‘हस्त’ नक्षत्रातला पाऊस चांगलाच गरजणार असल्याने या नक्षत्राचे वाहन ‘बेडूक’ चांगलाच ‘डराव’…’डराव’… करणारा ठरणारा आहे.
पावसाच्या सुरवाती पासूनच्या नक्षत्रातील आश्लेषा नक्षत्रापर्यंत चा पाऊस हा पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे होतो. तर अन्य नक्षत्रांचा पाऊस हा पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे होतो. यालाच परतीचा पाऊस असेही संबोधले जाते. यामुळे हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरतो. पश्चिम घाट परिसरात प्रामुख्याने अरबी समुद्रावरून म्हणजेच पश्चिम दिशेने येणार्या ढंगाद्वारे पाऊस पडतो. तर परतीचा पाऊस हा बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे येतो.
याशिवाय चित्रा व स्वाती या दोन नक्षत्रांचा पाऊस बेभरवशाचा असून त्याचा पिकांना उपयोग तर होतच नाही. मात्र नुकसानकारक ठरतो. थंडीचा हंगाम याचवेळी सुरू होत असल्याने रब्बी पिकांना पोषक हवामान यावेळी तयार झालेले असते. पाण सध्याचे वातावरण पाहता आश्लेशा, मघा, पूर्वा, उत्तरा ही पावसाची नक्षत्रे संपली. जिल्ह्यात पावसाचे थैमान कायम असून येत्या आठवड्यात मुसळदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुसळधार पाऊस करू शकतो नूकसान..
यावर्षी पावसाने चांगलीच उघडीप दिली असली तरी पाणी व्यवस्थापन व रिमझीम पावसावर बाजरीचे पिक शेतावर डोलू लागले आहे. २७ सप्टेंबरपासून पावसाचे हस्त नक्षत्र सुरू झाले असून हे नक्षत्र ११ ऑक्टोंबर रोजी संपणार आहे. या नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. या नक्षत्रात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २८ सप्टेंबर पासून राज्यभरात अती जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या पावसाने बाजरीच्या पिकाला नूकसान होण्याची शक्यता आहे.