बापू मुळीक
सासवड : पानवडी (ता. पुरंदर) येथील यात्रा 8 आणि 9 या तारखेला असून, त्या निमित्त बाहेरून येणाऱ्या मित्रमंडळी, पाहुणे, लेखी, युवक, युवती, जेष्ठ नागरिक, महिला यांना एसटीची सेवा मिळावी, यासाठी यात्रेनिमित्त जादा गाड्या सोडण्यात याव्यात, यासाठी सासवडचे आगार प्रमुख सागर गाडे यांना पानवडी गावच्या विद्यमान सरपंच अर्चना भिसे यांनी निवेदन दिले.
यात्रेनिमित्त कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने एसटी महामंडळ, विद्युत मंडळ यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी हरिभाऊ लोले शिवसेना तालुका अध्यक्ष पुरंदर यांच्या मार्गदर्शनाखाली, सरपंच अर्चना भिसे, माजी सरपंच संदीप भिसे, माजी सरपंच आबासो लोळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश भिसे, रोहिदास भिसे सामाजिक कार्यकर्ते समीर भिसे आदी उपस्थित होते.