Extortion News | पुणे : भाजपचे माजी सभागृहनेते आणि नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकावून २० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उडकीय आला. हा प्रकार ताजा असतानाच काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना देखील धमकावून खंडणीची मागणी करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
खंडणी न दिल्यास निवडणुकीला उभे राहू देणार नाही, गोळ्या घालून जीवे मारु…
याबाबत अविनाश रमेश बागवे (रा. पद्मजी पार्क, भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागवे यांच्या मोबाइलवर अज्ञाताने दूरध्वनी (व्हाॅटसॲप काॅल) केला. त्यांना धमकावून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास निवडणुकीला उभे राहू देणार नाही. गोळ्या घालून जीवे मारु तसेच राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी अज्ञाताने बागवे यांना दिली.
बागवे यांनी पोलिसांकडून तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune | हडपसर-वाघोली महापालिका होणार ?? राज्य शासनाने पावले उचलली
Pune Crime | कोयता गँगची दहशत ; अल्पवयीन मुलांनी केला एकावर कोयत्याने वार