पुणे : बिनबुडाचे खोडसाळपणे आरोप करून शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलची बदनामी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच मोठ्या नेत्याच्या नावाने धमकावून लाखो रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप संस्थेचे व्यवस्थापक एस. चव्हाण यांनी केला आहे. शेवाळवाडी येथील मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्यवस्थापन नीट नाही, शाळेचा परवाना रद्द करा, अशा घोषणा देऊन शाळेच्या आवारामध्ये आंदोलन केले. यावेळी आंदोलकांच्या आक्रमकपणामुळे शाळा व्यवस्थापन, महिला शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. शाळेतील महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप व्यवस्थापनाने केला आहे.
शाळेचा परवाना रद्द करा, मुलांना त्रास आहे आम्ही एका राजकीय नेत्याच्या खूप जवळचे आहोत, आम्ही शाळेला टाळे ठोकू अशी धमकी देऊन लाखो रुपयांची मागणी हडपसरमधील एका हॉटेलमध्ये केल्याचे त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण अधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचे व्यवस्थापक एस. चव्हाण यांनी सांगितले.