Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिसांकडूनच खंडणी वसुलीचा प्रकार; डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार निलंबित

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 June 2025, 15:55

पुणे: पोलीस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात, मात्र हेच पोलीस जर भक्षक बनले, तर काय? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांना मदतीसाठी तत्काळ पोहोचता यावे, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोबाईल पथकाने परिसरात गस्त घालून गुन्हे प्रतिबंध करणे अपेक्षित असते. मात्र, याच मोबाईल व्हॅनवर नेमलेले दोन पोलीस अंमलदारच नागरिकांना अटक करण्याची धमकी देऊन खोट्या तक्रारीच्या नावाखाली खंडणी वसूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ही बाब समोर आल्यानंतर पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी तात्काळ कारवाई करत डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदारांना निलंबित केले आहे. निलंबित पोलिसांची नावे गणेश दादासाहेब देसाई आणि योगेश नारायण सुतार अशी आहेत. पोलिस अंमलदार गणेश देसाई याला १७ जून रोजी रात्रपाळीसाठी मोबाईल क्रमांक वाहन चालक म्हणून तर योगेश सुतार याला बालगंधर्व परिसरात भेट मार्शल म्हणून नेमणूक देण्यात आली होती.

घटनेनुसार, डेक्कन पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली होती. फिर्यादीनुसार, लॉ कॉलेज रोडवरील दामले पथ येथे एका युवक-युवतीने आपली कार पार्क करून रात्री थांबले होते. त्या वेळी दोन पोलीस अंमलदार घटनास्थळी आले. त्यांनी या भागातून तक्रार आली असल्याचे सांगून त्या दोघांना अटक करण्याची धमकी दिली आणि २०,००० रुपये मागितले. “इतके पैसे का?” असे विचारताच, पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस चौकीत नेण्याची धमकी दिली. चौकीत जाऊन बदनामी होईल या भीतीने संबंधित युवक-युवतीने पैसे देण्याचे मान्य केले.

यानंतर, गणेश देसाई यांच्या दुचाकीवर मागे बसून संबंधित युवक कमला नेहरू पार्कमधील एटीएममध्ये गेला आणि तिथून २०,००० रुपये काढून पोलिसांना दिले. कायद्याच्या उल्लंघनासाठी चौकशी करायची असेल, तर पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीर कार्यवाही करणे आवश्यक असते. मात्र, या दोघांनी कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता त्यांना सोडून दिले. कर्तव्यात कसूर करत त्यांनी बेजबाबदारपणाचे वर्तन केले आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दोन्ही अंमलदारांना निलंबित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post

शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर पोहोचली मुंबई महापालिकेची टीम; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp