सागर जगदाळे
भिगवण : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये विधी ३ आणि ५ वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता पहिल्या वर्षानंतर संस्था/महाविद्यालय बदल करण्याकरिता १० जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पहिल्या वर्षानंतर संस्था/महाविद्यालय बदल करण्याकरिता १० जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ द्यावी व मेलद्वारे महाविद्यालयाचे प्रस्ताव घ्यावेत, या मागणीसाठी ९ जानेवारी २०२३ पासून उच्च शिक्षण संचालनालय पुणे येथे कॉप्स व छावा स्वराज्य सेना बेमुदत उपोषण करीत आहेत. उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे.
दरम्यान, कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड, युवक अध्यक्ष अलोक कनोजिया, छावा स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राम घायतिडक पाटील, उपाध्यक्ष आरिफ शेख, मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य संघटक प्रशांत कनोजिया, उपाध्यक्ष ॲड सचिन पवार उपस्थित होते. या दोन दिवसाच्या मुदतवाढीमुळे विधी शाखेतील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.