Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे सरकारने लाडकी बहीण योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्या महिलांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता मात्र, महिलांना माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत ही नवीन मुदत दिली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे.
या कागदपत्रांची करावी लगेल पूर्तता
- आधार कार्ड
- अधिवात/जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराने हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
या आहेत अटी
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करु शकतील.
- आधी लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता. नवीन बदलानुसार तो 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आले आहे.
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.