राजगुरुनगर : भारत निर्वाचन आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १९७ खेड आळंदी विधानसभा मतदार विधानसंघातील सर्व उमेदवारांच्या निवडणूक विषयाच्या प्रथम खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक वेंकादेश बाबू (कार) यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर तहसीलदार कार्यालयामध्ये ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील दैनंदीन हिशोबांची नोंदवही व त्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे, नोंदवहया व अभिलेखांसह उपस्थित होते.