बापू मुळीक / सासवड : 202 पुरंदर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तपासणी खर्च निरीक्षका मार्फत केली जाणार आहे. पुरंदर मतदार संघातील पंचायत समिती पुरंदर मीटिंग हॉल निवडणूक खर्च नियंत्रण कक्षात खर्च तपासणी करण्यात येईल.
ही तपासणी ही तीन टप्प्यात होणार असून, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 10 नोव्हेंबर रोजी, तर दुसरी तपासणी 14 नोव्हेंबर रोजी, तिसरी तपासणी 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे.