पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकातील माजी आमदाराच्या मुलाने अभिनेत्रीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कर्नाटक येथील माजी आमदाराच्या मुलाने पुण्यात राहणाऱ्या एका अभिनेत्रीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात राहणाऱ्या मराठी-हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या ३२ वर्षीय सिनेअभिनेत्रीची माजी आमदाराच्या मुलासोबत सोशल माध्यमातून ओळख झाली होती. या माजी आमदाराच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर अत्याचार केला आहे.
अभिनेत्रीने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आरोपीने अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर पीडित अभिनेत्रीने लग्नाची विचारणा केली असता आरोपीने तिच्या डोक्यावर पिस्तूल रोखत तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली. तसेच त्याने शिवीगाळही केली. या प्रकरणी आरोपी विरोधात पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.