Pune News : पुणे : राज्यात मालमत्ता खरेदीसाठी(Property Purchase) नवे रेडीरेकनर अर्थात बाजारमूल्य दर घोषित (Announced)होतात. त्यामुळे मार्चअखेर दस्त नोंदणीसाठी (Registration of Deeds)मोठी गर्दी होती. १ एप्रिलपासून त्याअनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभागाने गुरुवारी (ता. ३०) रामनवमीची (Ramnavami) सुट्टीे (Holiday)असतानाही दस्त नोंदणीची हवेलीतील (Haveli) सर्व २७ कार्यालये (27 Office) सुरू ठेवण्याचा निर्णय (Decision)घेतला आहे.
गुरुवारी रामनवमीनिमित्त सरकारी सुट्टी असते. मात्र मार्चअखेर असल्याने दस्त नोंदणीसाठी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी असते. सुट्टीमुळे ग्राहकांना अडचण निर्माण झाली असती. त्यामुळे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनकडून गुरुवारीही कार्यालये सुरू ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच एक एप्रिलला नवे रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. त्यामुळे अनेक ग्राहकांचा मार्चअखेर दस्त नोंदणीकडे कल असतो.
या काळात गर्दी होत असते. या बाबी लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी हवेलीतील सर्व २७ कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या व पक्षकारांच्या सोयीसाठी ही कार्यालये कार्यालयीन वेळेत सुरू राहतील, अशी माहिती सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश खोमणे यांनी दिली.