राजेंद्रकुमार शेळके
Ojhar News : ओझर : ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती एस.आर. केदारी बालक मंदिरमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे मोठ्या आनंदात व उत्साहात स्वागत करण्यात आले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पारखे यांनी केले.
ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित
या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त डॉ. विद्वांस सर तसेच ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाशमामा पाटे, (Ojhar News) ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर सर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह रविंद्र पारगावकर, बालकमंदिर शाळेचे चेअरमन अरविंदभाऊ मेहेर, अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन डॉ.आनंद कुलकर्णी तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालय समितीचे अध्यक्ष रमेश जुन्नरकर सर, बालक मंदिर समितीचे सदस्य शशिकांत वाजगे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पारखे व उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे या सर्वांनी नवोगतांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
शाळेचा संपूर्ण परिसर आकर्षक पद्धतीने सजावट करून सुशोभित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी (Ojhar News) आपल्या सुमधूर आवाजात गणपतीचे गीत व बालगीत सादर केले. शेवटी विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना गोड गोड खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. सूत्रसंचालन संगिता बांगर यांनी केले व आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ojhar News : श्रीक्षेत्र ओझरच्या विघ्नहर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
Ojhar News : तब्बल ४२ वर्षांनी पुन्हा एकदा झाली वर्गमित्रांची भेट
Pune News : एनडीएतील मेजर पदावरील अधिकार्याला सासऱ्याने केली मारहाण