लोणी काळभोर : शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
कोल्हापूर येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील निबंध, चित्रकला, वक्तृत्व व सुगम गायन स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विद्यालयातील ६ विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवली. यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे, शिक्षिका राजश्री झेंडे, साधना राऊत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, विजेते स्पर्धक संस्कृती वाडेकर, श्रावणी मकर, सानवी बंडगर, सुशांत कोळी, भूमी चव्हाण व पृथ्वीराज काळभोर यांचा शाळेच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्री-प्रायमरीच्या इन्चार्ज सुलताना इनामदार, प्रिती कदम, हर्षा शितोळे, प्रियंका काळभोर, विशाल झुरुंगे, शिवराज साने, कविता कोरे, अपर्णा काळभोर, प्रिया बंडगर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे होतंय सर्वत्र कौतुक
शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धेत लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या ६ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विजेत्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
लहान गट : वक्तृत्व स्पर्धा
सुगम गायन स्पर्धा – संस्कृती योगेश वाडेकर (प्रथम), श्रावणी संजय मकर (द्वितीय), सानवी सुनील बंडगर (तृतीय).
मोठा गट : सुगम गायन स्पर्धा – सुशांत दशरथ कोळी (प्रथम), निबंध स्पर्धा – भूमी कुंडलिक चव्हाण (तृतीय), चित्रकला स्पर्धा – पृथ्वीराज राजेंद्र काळभोर (द्वितीय)