प्रिया बंडगर
लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मिडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात वार्षिक स्नेहसमेलन, पारितोषिक वितरण व संगणक कक्ष उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली. यावेळी लोणी काळभोरच्या विद्यमान सरपंच माधुरी काळभोर, साधना बँकेच्या संचालिका वंदना काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा शेवाळे यांनी शाळेच्या कामकाजाची रुपरेषा मांडली.
यावेळी बोलताना अभयकुमार साळुंखे यांनी बापूजीच्या जीवन पटावरती प्रकाश टाकला व तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी व्हावा यासाठी मौल्यवान असे मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अर्थसचिव प्राचार्य सीताराम गवळी, विद्यासमिती सचिव प्राचार्य सुळगेकर, साधना सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाष काळभोर, योगेश काळभोर, भारती काळभोर, सुनंदा शेलार, युगंधर काळभोर, जगताप , इंदलकर, राहुल काळभोर, बाळासाहेब दौंडकर , विनायक कांबळे, ज्योती काळभोर, शामराव शेवाळे, राजाराम काळभोर, हरिभाऊ काळभोर, गणेश कांबळे, प्रा. कुरणे, प्राचार्य झिंगूरके, प्राचार्य सय्यद, संगीता काळभोर, पर्यवेक्षिका विद्यावती शिंदे, साधना बँकेचे बडदे , जगताप, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गतवर्षी वार्षिक परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच शालेय उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना करुन झाली.
विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गायन व नाटक यांचे दिग्दर्शन शिक्षकांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अथर्व मोरे व प्रिया सातपुते या विद्यार्थ्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपर्णा काळभोर यांनी केले तर आभार प्रभारी एस. आर. इनामदार यांनी मानले. त्यानंतर वंदे मातरम् या देशभक्तिपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.