Employment News : पुणे : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण पुणे जिल्हा न्यायालयात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत लेखापाल अर्थात अकाउंटट पद भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे.
२५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
पुणे जिल्हा न्यायालयात लेखापाल या पदासाठी भरती केली जात आहे. यामध्ये केवळ एका जागेसाठी प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे. (Employment News) तसेच यासाठी २५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय असावी?
– अर्ज करणारा उमेदवार वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखेतून पदवीधर असावा.
अर्ज करण्याचे माध्यम
– ऑफलाईन.
किती मिळू शकतो पगार?
– या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 25,000 रुपये पगार मिळू शकतो.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
– 05 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
– ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. (Employment News) त्यासाठी मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आवार , नवीन इमारत, शिवाजीनगर, पुणे ४११००५ या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अधिक माहितीसाठी
– या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://districts.ecourts.gov.in/pune वर भेट देऊन माहिती घेता येऊ शकणार आहे. पण लक्षात घ्या अर्ज करण्याचे माध्यम हे ऑफलाईन असणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Employment News : UPSC मध्ये निघाली मोठी भरती; अनेक पदे भरली जाणार, आजच करा अर्ज…
Employment News : आता परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; जाणून घ्या पात्रतेचे निकष…!
Indapur News : मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्देवी : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील