राजेगाव : राजेगाव (ता.दौंड) येथील भीमा नदीपात्रात शेतकऱ्यांनी बसविलेल्या पाच विद्युत मोटारींच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. दौंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, अद्याप चोरटे मोकाट फिरत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विद्युत पंप चोरीच्या घटनेनंतर पोलीस पाटील महेश लोंढे, तंटामुक्ती अध्यक्ष शहाजी गुणवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दौंड पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, पोलीस पाटील महेश लोंढे म्हणाले, की मोटारीच्या तारा चोरीचे प्रमाण वाढले आहे, पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. शेतकरी बांधवांनी स्वतः दक्ष राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.