युनूस तांबोळी
शिरूर – Pune Election : शेतकऱ्याचा शेतीमाल योग्य दरात व योग्य ठिकाणी विक्री होण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती तयार करण्यात आली. (Pune Election) या बाजार समितीतून शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सभापती, उपसभापती व संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या विचाराचे पाहिजे. (Pune Election) अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीतून व्यापाऱ्यांनी संघटना करून रूमाल आडून केलेल्या लिलावाने शेतकऱ्यांचे कुटूंब उद्धवस्त होते हे विसरून चालणार नाही. (Pune Election)
कष्टाने व अंगमेहनतीने पिकवलेल्या काळ्या मातीतील सोन्यासारखे पिक निसर्गाच्या लहरीपणाने मातीमोल ठरतो. निसर्गाच्या लहरीपणातून चुकून पिक जोमात आले तर बाजारभाव नसतो. या अनेक अडचणिंना बळीराजा नेहमीच ग्रासलेला आहे. या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘संचालक’ म्हणून असणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदार राजा जागा हो…,पैशाच्या पाकिटाला भुलू नको…,जो समस्यांसाठीदेईल तुला आधार…, मत तू त्याला बहाल कर.
निवडणूक म्हणजे धनदांडग्यांची लढाई…
प्रत्येक निवडणूक ही आता पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर लढवली जाते. लोकसभा असो की विधानसभा या निवडणुका लढविण्यासाठी सर्व सामान्य कुटूंबातील व्यक्ती पुरेसा पडत नाही. वारसाहक्काने चालत आलेल्यांनाच मोठ करण्याच राजकारण या निवडणुकांत असते. सर्व समान्यांच्या घरात बुद्धीवान किंवा दुरदृष्टी असणार नेतृत्व जन्माला येत ही. पण काय उपयोग येथे निवडणुक लढविण्या इतकी ताकद त्यांच्यात नसतेच हे सत्य आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या निवडणुका पाठोपाठ सर्व सामान्यांच्या जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुका देखील पैशावरच चालतात. तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व सामान्य शेतकरी कुटूंबातील उमेदवार असणे गरजेचे आहे. पण ज्याचा तालुक्यात वट आणि पैसा आणि प्रतिष्टा असेल अशाच उमेदवाराची निवड करण्याकडे विविध पक्षांचा कल असतो. एकंदर काय तर ज्याला बळीराजाच्या समस्या अडचणी माहिती नाहित अशा धनधांडग्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीच्या रिंगणाच उतरविले जाते. त्यामुळे मग शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या कुणी असा प्रश्न निर्माण होतो.
बीट आणि लिलावाच्या पद्धती…
तालुक्याच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी गाळ्यांचे नियोजन केलेले असते. या ठिकाणी शेतमालाच बिट किंवा लिलाव करण्याची पद्धत आहे. पुर्वी व्यापाऱ्यांमध्ये हातावर रूमाल टाकून लिलाव केले जात होते. त्यातून त्यांच्या पद्धतीने लिलाव केले जात होते. शेतकऱ्याला आपला माल कोणत्या दर्जाचा आहे. त्याचा कशा पद्धतीने लिलाव केला पाहिजे. याची कल्पना देखील दिली जात नव्हती. पुढे असे लिलाव बंद झाले.
त्यानंतर धान्याच्या बाबतीतही व्यापारी एकत्रीत येऊन बिट करतात. त्यातून मालाची किंमत ठरवली जाते. आजही त्यामुळे शेतकरी आपल्या मालाची किंमत ठरवू शकला नाही. हे त्या शेतकऱ्याच सगळ्यात मोठ दुख आहे. सध्या व्यापारी मालाची किंमत कमी ठरवितात. यासाठी काही बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. जर शेतमालाची किंमत शेतकरी ठरवणार असेल तर आपल्या हक्काचा माणूस कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून गेला पाहिजे.
बाजार समितीची कार्यपद्धती…
बाजाराच्या आवारात शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे.शेतकर्यांच्या शेतीमालाविषयी हिताचे संरक्षण करणे.शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री करणे. बाजाराच्या आवारात विक्रीस आलेल्या शेतीमालाचे चोख वजनमाप करणे.शेतकर्यांना शेतीमाल विक्रीचे २४ तासांत पैसे मिळवून देणे. विवादाची विनामुल्य तड़जोड़ करणे.शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात शेती मालाची खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत याची दक्षता घेणे.
शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकर्यांना उत्तेजित करणे.आड़ते/व्यापारी, हमाल, तोलणार, मदतनीस, प्रक्रियाकार यांना परवाने देणे, परवान्यांचे नुतनीकरण करणे, रद्द करणे इ.बाजार समिती कायदा व नियमातील तरतुदीनुसार परवानाधारक यांच्या हिशोबाच्या नोंदवह्या व अनुषंगिक कागदपत्रांची तपासणी करणे व हिशोब/बिलपट्ट्या प्रमाणित करणे.
उमेदवारांच्या जागा…
सर्वसाधारण ७ जागा, महिला प्रतिनिधी २ जागा, इतर मागासवर्गीय १ जागा, अनुसूचीत जमाती १ जागा, सर्वसाधारण २ जागा, अनुसूचीत जमाती १ जागा, आर्थीक दुर्बल १ जागा, व्यापारी आडत २ जागा, हमाल तोलारी १ जागा अशा जागामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवली जाते.
मतदान करताना सावधान …
पुणे जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका लागल्या आहेत. त्यासाठी २८ एप्रिल ला मतदान होणार आहे. यासाठी सभा, दारोदार प्रचार व मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. काहि ठिकाणी बेलभंडार उचलून बाजार समितीवर आपल्याच पक्षाचा झेंडा लागणार असा दावा होऊ लागला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पक्षांनी आपली यंत्रणा उमेदवाराच्या पाठिशी उभी केली आहे.
पण बळीराज्याचे होणारे आतोनात नुकसान, अवेळी पाऊसाचा लहरीपणा, दुष्काळ अन निसर्गाने शेतमालाचे केलेले नूकसान विसरू नका. या पडत्या काळात ज्याने शेतकऱ्याने हात दिला. त्याच्यासाठी मतदानाचे दान तुम्ही जरूर द्या. पण भविश्यात तुमच्या संकटाना, समस्यांना आधार नसेल तर तुम्ही पुन्हा बळीराज्याच्या डोळ्यात पाणि आले असेही म्हणू नका.
कारण संकटाच्या काळात डोळ्यातील अश्रु पुसणारे अगदी कमी असतात. पावसात भिजलेला कांदा, कमी दराने माती मोल ठरलेली फळे, दुष्काळाने धान्यच उगवले नाही, बोगस बियाणे, खतांचा तुडवडा, औषधांची महागाई या ना अनेक अडचणी तुमच्या समोर भविष्यात उभ्या राहणार आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत तुम्ही निवडून दिलेला संचालक हा आपल्या मताचा पाहिजे असेल तर आत्ताच सावध व्हा. खऱ्या उमेदवाराला निवडून देऊन संकटे व समस्यांचा आधार मिळवा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ‘त्या’चार उमेदवारांचे अर्ज कायम…