शिक्रापूर : शेतकरी कामगार पक्षाचे दोन दिवसीय १९वे अधिवेशन (पंढरपुर, जि. सोलापुर) येथे पार पडले. आठ ते दहा हजार कार्यकर्त्यांच्या या अधिवेशनात पुणे जिल्ह्यातुन भाई बोऱ्हाडे यांची एकमताने मुख्य चिटणीस मंडळात सदस्य म्हणुन निवड झाली. ते पक्षात १९८८ पासुन काम करत असुन या काळात पक्षाचे नेते प्रा.एन.डी पाटील, दि.बा.पाटील, अॅड दत्ता पाटील, मोहनराव पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोडंगे पक्षाचे सरचिटणीस, आमदार जयंतराव पाटील या मोठ्या नेत्याचा सहावास लाभला.
पक्षाची तत्व प्रामाणिकपणा व गारेगरीब जनतेशी त्यांची असलेली बांधीलकी त्यांनी ३५ वर्षात जतन केली. १९८८ ते २०१५ पर्यंत भाई बोऱ्हाडे यांनी अनेक उपोषणे, धरणे, मोर्चे अशी आंदोलने केली. एन.डी.पाटील यांचेबरोबर खेडच्या विमानतळाचा लढा, रायगडाचा सेझचा लढा ,तुकाराम महाराजाच्या भंडारा डोंगराच्या लढाईचे उपोषण, विजमंडळाचे विरोधातला लढा, वाळु कामगार, सणसवाडी व लोणावळा येथील इंडस्ट्रियल कामगार संघटनेच्या माध्यमातुन काम केले.
सोनेसांगवी गावचे पाच वर्ष सरपंच म्हणुन काम केले १९९२, २०००, २००७ अशा तीन वेळा पंचायत समिती २०१२ ला जिल्हापरिषद अशा निवडणुका पक्षाच्या तिकिटावर लढविल्या. त्यांना मिळालेले पद हे त्याचे फळ आहे. उरलेले आयुष्य गरीब शेतकरी कष्टकरी यांच्या चळवळीसाठी द्यायचे असे बोऱ्हाडे यांनी सांगितले. पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयवंतराव पाटील व कार्यालयीन चिटणीस भाई अॅड. राजेंद्र कोरडे यांनी निवडीचे पत्र दिले.