विजय लोखंडे
वाघोली : श्री क्षेत्र वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी किर्ती अमोल पायगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच वैशाली चंद्रकांत केसवड, माजी उपसरपंच तथा सदस्य संदिप गावडे, माजी उपसरपंच तथा सदस्य सुमित शिंदे, माजी उपसरपंच तथा सदस्या मोनाली भोर (गावडे), ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार भोर, सदस्य संतोष चव्हाण, सदस्य गणेश भोरडे, सदस्या सोनाली रिकामे, सदस्या सोनाली शिंदे, सदस्या स्वाती इंगळे, सदस्या संध्या गावडे उपस्थित होते.
माजी उपसरपंच मोनाली भोर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त असलेल्या जागेसाठी किर्ती अमोल पायगुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड जाहीर करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच वैशाली केसवड यांच्या अध्यक्षतेखाली तर निवडणूक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी संतोष भोसले यांच्या अधिकाराखाली पार पडली.
उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल किर्ती अमोल पायगुडे यांचा सत्कार माजी आमदार बापूसाहेब पठारे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, वाडेबोल्हाईचे जेष्ठ नेते तथा माजी उपसरपंच संजयराव भोरडे, सरपंच वैशाली चंद्रकांत केसवड, युवा नेते प्रदिप शिंदे, आदी मान्यवर, ग्रामस्थांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष तथा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय पायगुडे, माजी उपसरपंच चंद्रकांत केसवड, आदी गावचे आजी, माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक वारसा जपत बैलगाडीने काढली मिरवणूक
बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच किर्ती अमोल पायगुडे यांची पारंपारिक वाद्यात, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत, पारंपरिक वारसा जपत बैलगाडीतून वाडेबोल्हाई गावाला वळसा घालून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे या पारंपरिक जुन्या पद्धतीच्या मिरवणुकीमुळे पायगुडे परिवाराचे कौतुक व अभिनंदन सर्व स्तरावर केले जात आहे.