उरुळी कांचन (पुणे) : येथील अक्षय महाराज रोडे यांची भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. भाजपचे (उत्तर) जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते त्यांना नुकतेच निवडीचे पत्र देण्यात आले.
पुणे जिल्हा भाजप अध्यात्मिक आघाडी कार्यकारणीचा पदाधिकारी नियुक्ती समारंभ नुकताच जिल्हा कार्यालय चाकण येथे पार पडला. या वेळी भाजप अध्यात्मिक व समन्वय आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय घुंडरे, भाजप अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड, भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष मनोज मांजरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, भाजप अध्यात्मिक आघाडी प्रमुख सुनिल महाराज वरघडे, उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित कांचन, जिल्हा युवती उपाध्यक्षा पूजा सणस, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष ऋषिकेश शेळके, उद्योजक प्रशांत रोडे, अध्यात्मिक आघाडीचे शुभम वेदपाठक तसेच बहुसंख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना अक्षय रोडे म्हणाले की, भविष्यात अध्यात्मिक संस्कार वाढीसाठी व देव, देश, धर्म कार्यासाठी आणखी जोमाने काम करत, जास्तीत जास्त तरुण पिढीला अध्यात्मिक क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.