Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Election : पक्ष सोडला, पण मैदान नाही! प्रशांत जगताप महापालिका निवडणूक लढवणारच; अपक्ष की नव्या पक्षात? पुण्याच्या राजकारणात सस्पेन्स वाढला!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 21:59
Election

photo- social media

Election : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, शरद पवार गटाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Election)

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास प्रशांत जगताप यांचा ठाम विरोध होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांमुळे ते अस्वस्थ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अखेर हा निर्णय घेत त्यांनी राजीनामा दिला असला, तरी राजकारणातून बाहेर पडणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. उलट, आपण पुणे महापालिकेची निवडणूक नक्की लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता जगताप अपक्ष निवडणूक लढवणार की नव्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Election)

राजीनाम्यानंतर बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, “गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. पक्ष निवडणूक कशी लढवायची, यावर आम्ही सगळे काम करत होतो. जाहीरनामाही तयार झाला होता. पण त्याचवेळी अनेक राजकीय अफवा पसरवल्या गेल्या. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता अस्वस्थ झाला होता.”

ते पुढे म्हणाले, “आपली भूमिका काय असावी, पुढचा प्रवास कसा असावा, याबाबत मनात प्रचंड घालमेल सुरू होती. ही घालमेल जास्त काळ ठेवणं योग्य नाही, असं मला वाटलं. ही अस्वस्थता आयुष्यावर परिणाम करु शकते, आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून सर्वांचा सन्मान राखत मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.”

 

मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “मी राजकारण सोडत नाही, समाजकारण सोडत नाही. माझा राजकीय प्रवास थांबलेला नाही. मी महापालिकेची निवडणूक लढवणार आहे आणि पुणे व राज्याच्या हितासाठी माझी लढाई पुढेही सुरूच राहील.”

दरम्यान, आपण आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना ई-मेलद्वारे पाठवला असल्याचंही प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे. या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post
Pune

Pune : पुणेकरांनो, यंदा पार्टी पहाटे ५ पर्यंत चालणार! २४, २५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ पर्यंत पुण्याचे नाईटलाईफ सुरू; पण पोलिसांची 'या' गोष्टींवर करडी नजर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp