दीपक खिलारे
इंदापूर Election : इंदापूर कृषी (Election) उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १४ जागांसाठी शुक्रवारी (दि.28) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी एकूण 96.23 मतदानाची टक्केवारी झाली. (Election)
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांची निवडणूक
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांची निवडणूक लागली होती. या अठरा जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. उरलेल्या 14 जागांसाठी 34 जणांचे भवितव्य आज झालेल्या मतदानावेळी मतपेटीत बंद झाले.
यावेळी विकास सोसायटीच्या 3 हजार 131 मतदारांपैकी 2 हजार 996, ग्रामपंचायत मतदारसंघात 1 हजार 991 मतदारांपैकी 1 हजार 963 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 4 हजार 322 मतदारांपैकी 4 हजार 151 जणांनी या निवडणुकीमध्ये मतदान केले. मतदानाची एकूण टक्केवारी 96.23 अशी आहे.
या निवडणुकीमध्ये 14 जागांसाठी 34 जणांनी आपले नशीब आजमावले. यामुळे संचालक पदी कोणाची वर्णी लागणार हे शनिवारी दि.29 रोजी मतमोजणीतून समजणार आहे. यामुळे तालुक्यात निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टक्के मतदान..!
Election : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात १४ जागांसाठी ३४ उमेदवार