लोणी काळभोर, ता. 25: जम्मू कश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत 600 हून अधिक पर्यटक स्वगृही परतले आहेत. अजूनही अंदाजे 300 पर्यटक कश्मीरमध्ये अडकले असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनाही परतीची आस लागली आहे. त्यांना महाराष्ट्रात लवकर पाठविण्यासाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, आरोग्यदूत युवराज काकडे, प्रशांत साळुंखे, अक्षय लोभे सह ठाण्यातील अनेक कार्यकर्ते याचे नियोजन करत आहेत. अशी माहिती थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सदस्य तथा आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना युवराज काकडे म्हणाले कि, कश्मीर येथील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. तसेच या परिस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी देण्यात येत आहे. पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप पाठविण्यासाठी त्यांची सर्वोतोपरी मदत घेत आहोत. कश्मीरमध्ये महाराष्ट्रातील अद्यापही काही पर्यटक अडकल्याची माहिती मिळत आहे. त्या सर्वांना एका ठिकाणी आणण्याचे काम चालू आहे. पर्यटकांचे विमान उद्या शनिवारी (ता.26) श्रीनगरहून मुंबईला दाखल होईल.
शेवटचा पर्यटक सुखरुप पोहोचेपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदतकार्य अविरतपणे सुरू राहील. तसेच सर्वांना विनंती करण्यात येते कि, जर आपले कोणी नातेवाईक इकडे कश्मीर मध्ये अडकले असतील तर मदतीसाठी मंगेश चिवटे यांच्याशी 9665951515 या क्रमांकावर तर माझ्याशी 9881679494 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नंबर लागत नसल्यास, पुढील 2 दिवस व्हाट्सअॅपवर संपर्क साधावा. असे आवाहन मंगेश चिवटे आणि युवराज काकडे यांनी केले आहे.