शिक्रापूर (pune): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अमृता चौधरी ही आठ वर्षीय बालिका तिच्या आई सोबत आई कामाला असलेल्या ठिकाणी आपल्या भावंडांसह गेली होती. सकाळच्या सुमारास चिंचेच्या झाडाखाली खेळत असताना अमृता चिंचा काढण्यासाठी झाडावर चढली. मात्र, यावेळी पाय घसरल्याने झाडावरून खाली पडली. यावेळी अमृताच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने नागरिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच अमृता अमावस चौधरी (वय ८ रा.. वढू बुद्रुक ता. शिरुर) हिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत विकास कृष्णा चौधरी (वय २० रा. वढू बुद्रुक ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.