शिरूर: शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात ईद -उल -फित्र म्हणजेच रमजान ईद उत्साहत साजरी करण्यात आली. प्रेम, शांती व एकतेचा संदेश देत नमाज पठण नंतर गळाभेट घेऊन दैनंदिन जीवनात आपणाकडून कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागत घरोघरी शिरखुर्मा वाटपाने रमजान ईदची सांगता झाली.
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथे रमजान ईदनिमित्त जाम सुन्नी मशिदीमध्ये मौलाना अब्दुल रज्जाक यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर एकमेकांनी गळाभेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी हिंदू बांधवानी मुस्लिम बांधवाना दिलेल्या शुभेच्छामुळे एकतेचा संदेश दिल्याचे पाहावयास मिळाले. माजी पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना विशेष शुभेच्छा दिल्या.
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथे सुन्नी मुस्लिम जमातच्या वतीने ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण केले. सलोख्याचा संदेश देत एकमेकांना गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. माजी आमदार पोपटराव गावडे व राजेंद्र गावडे यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. बुधवारी ( ता. १० ) माजी सरपंच दामुआण्णा घोडे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रोजा (उपवास ) करणाऱ्या मुस्लिम बांधवाचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, भाऊसाहेब महाराज उचाळे, दगडूभाई हवालदार, सिंकदर पटेल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कान्हूर मेसाई, सविंदणे, रावडेवाडी, मलठण, जांबूत, पिंपरखेड या ठिकाणी सामुहिक नमाज पठण करून मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली.
इस्लाम धर्म प्रेम व एकतेचा संदेश देणारा असून रोजा, जकात, दान, नमाज पठण करून मुस्लिम बांधव रमजान ईद साजरी करत असतात. यामध्ये येणारी शब ए कद्रची नमाजला महत्व आहे. कळत नकळत घडणाऱ्या चुकांसाठी क्षमा मागून आपआपसातील प्रेम भाव वाढवा, अशा शुभेच्छा देऊन मुस्लिम बांधवांनी ही ईद- उल- फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली.
– अल्ताफ तांबोळी, अध्यक्ष -ओबीसी संघटना शिरूर