– विजय लोखंडे
वाघोली (पुणे) : पूर्व हवेली तालुक्यात कोलवडी-साष्टे हे गाव पुणे-सोलापूर व पुणे-नगर या दोन्ही महामार्गाच्या मध्यावर आहे. पुणे, हडपसर शहरालगत मुळामुठा नदीकाठी, वाढत असलेल्या मोठ्या लोकसंख्येचे मुख्य गाव म्हणून ओळखले जाते. दळणवळणाच्या दृष्टीने आमचे गाव महत्वाचे समजले जाते. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन सर्व ग्रामपंचायत कार्यकारणीच्या सहकार्यातून विकासकामे करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मत सरपंच विनायक गायकवाड यांनी बोलताना सांगितले.
कोलवडी-साष्टे(ता.हवेली) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ (दि.25) मंगळवारी सकाळी गावातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. अशी माहिती उपसरपंच रमेश मदने यांनी दिली.
या कार्यक्रमावेळी यशवंत कारखान्याचे संचालक रामदास गायकवाड, माजी संचालक मिलापचंद गायकवाड, जयसिंग गायकवाड, कृ.उ.बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड, कोलवडी ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक गायकवाड, उपसरपंच रमेश मदने, माजी सरपंच सतीश गायकवाड, माजी उपसरपंच बाळासो भाडळे, म्हस्कु गायकवाड, दिलीप गायकवाड, विकास कांचन, विलास भोसले, दत्तात्रय कदम, नानासो मुरकुटे, अशोक गायकवाड, उत्तम जगताप, शंकर मदने, अविनाश रिकामे, आदी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
विविध विकास कामांच्या भूमिपूजनात नवीन ग्रामसचिवालय बांधकाम करणे, काकाश्री पार्क रस्ता कॉक्रिट करणे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम करणे, साठे नगर रस्ता करणे, कोलवडी स्मशानभूमी संरक्षक भिंत करणे, साळुंके वस्ती रस्ता करणे, साष्टे स्मशानभूमी रस्ता करणे, कोलवडी-मांजरी रोड चौक सुधारणा करणे, माऊली नगर रस्ता करणे, जि.प.शाळा कोलवडी शौचालय बांधणे, जि.प.शाळा साष्टे शौचालय बांधणे, जि.प.शाळा गायकवाड वस्ती शौचालय बांधणे या विकासकामांचा समावेश आहे.