( Election News ) पुणे : हवेली बाजार समिती निवडणुकीत ( Election News ) जुन्या लोकांनी उमेदवारीची अपेक्षा धरु नये असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी दिला आहे.
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत बाजार समितीच्या मतदारांचा मेळावा रविवारी ( ता.१२) मार्केट यार्ड पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
पुणे बाजार समितीच्या तत्कालीन बरखास्त केलेल्या संचालक मंडळाची चौकशी सध्या सुरू…
पुणे बाजार समितीच्या तत्कालीन बरखास्त केलेल्या संचालक मंडळाची चौकशी सध्या सुरू असून त्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल. या निवडणुकीसाठी जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने जुन्या लोकांनी उमेदवारीसाठी अपेक्षा धरु नये असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले.
या निवडणुकीत निष्ठावांना संधी द्यायची की पक्षभेदी लोकांना संधी द्यायची याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. कसबा विधानसभा निवडणुकीसाठी रवींद्र धंगेकर हा लोकांच्या मनातील उमेदवार होता. तो हरहुन्नरी, लोकांना भेटणारा, त्यांच्यापर्यंत पोहोचणारा, सर्वांशी चांगले संबंध ठेवणार असा कार्यकर्ता होता. त्यामुळे या निवडणुकीत विविध पक्षातील व्यक्तींनी त्याला सहकार्य केले. आजपर्यंतच्या ७५ वर्षाच्या इतिहासात विधिमंडळात लोणार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे धंगेकर हे दुसरे आमदार ठरले आहेत. असेही पवारांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, सुरेश घुले, सोनबा चौधरी, गणेश घुले, माधव काळभोर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे, राजेंद्र खांदवे,मार्केट यार्डचे आडते ,व्यापारी, हमाल आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Ajit Pawar News : विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांना घेरलं
Ajit Pawar News : अजित पवार यांना मोठा झटका ; विखे पिता पुत्राची अहमदनगरमध्ये यशस्वी खेळी