पुणे : खेड-शिवापूर टोलनाक्यावर बुधवारी (ता.२१ ) सकाळी साडेदहाच्या दरम्यान पीएमपीएलच्या बसगाड्या फास्टॅग उपलब्ध नसल्याचे कारण सांगून तब्बल दोन तास टोलनाक्यावर थांबावे लागल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
याबाबत टोलनाका प्रशासनाकडून सांगण्यात आले की, पीएमपीएमएल प्रशासनाने सातारा रस्त्यावरील नवीन बसगाड्यांसाठीची मासिक फी व गाड्यांबद्दलची माहिती पाठविण्यात आली होती. मात्र, संबंधित बसगाड्या ज्या वेळेस टोलनाक्यावर आल्या, त्या वेळी बसगाड्यांवरील फास्टॅग हे बंद होते. त्यामुळे या गाड्यांचे फास्टॅग रिचार्ज होत नसल्याने या वाहनांना अडविण्यात आले होते.
पुणे-सातारा महामार्गावर ग्रामीण भागासाठी पीएमपीएमएलच्या वतीने ११ बसगाड्या धावतात. यामध्ये सारोळा, विंझर, बालाजी मंदिर व नसरापूर या ठिकाणी साधारणपणे त्या प्रवासी घेऊन जातात. या ११ बसगाड्यांसाठी खेड शिवापूर टोलनाक्यावर फास्टॅग प्रणाली बसविण्यात आली होती. मात्र, बुधवारी बस प्रशासनाच्या वतीने सोडलेल्या बसगाड्या बदलण्यात आल्या होत्या.