पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांच निलंबन करण्यात आले होते.
ड्रग माफिया ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याचा ज्यांचावर आरोप होत होता ते ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीने दोषी ठरवले आहे. या समितीच्या अहवालानुसार ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होती. डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते.
या प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासनही रडारवर आहे. कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी दोघेही अटकेत आहे. सुधाकर इंगळे मार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाले होते. सुधाकर इंगळे आणि डॉ संजय मरसळे या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मरसळे हा ललित पाटील पळून जाण्याच्या दोन दिवस आधी त्याच्याशी संपर्कात होता. मरसळे यांनीच पैसे घेऊन ललितला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी “रेफर” केलं होत. डॉ. संजय मरसळे यांच्या मोबाईलमध्ये अभिषेक बलकवडे चे “कॉल” सापडले होते. बलकवडे हा ललित पाटीलचा ड्रग्स कंपनी सांभाळणारा साथीदार होता