जनार्दन दांडगे
उरुळी कांचन, (पुणे) : येथील डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूकीत डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या पॅनेलचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत.
डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या नेतृत्वाखालील “डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेलचे १३ च्या १३ उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी पॅनेलचे सुनील जगताप, अर्जुन कांचन यांच्या नेतृत्वाखाली “डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल”ला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सुनील जगताप यांच्या पॅनेलला तीन आकडे हि मतदान मिळवता आली नाही.
दरम्यान, उरुळी कांचन डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूकीत बुधवारी (ता. ०४) ६४ टक्के मतदान झाले होते.
डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेलचे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :-
सर्वसाधारण गट – राजेंद्र ज्ञानोबा कांचन, रामदास पंढरीनाथ चौधरी, भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, कांतीलाल कोंडीराम चौधरी, संजय ज्ञानोबा कांचन, खेमचंद विष्णुदास पुरुसावानी, संजय तुळशीराम टिळेकर, अनिकेत राजेंद्र कांचन,
महिला सर्वसाधारण गट – सारिका जयंत काळभोर, कमल बाळासाहेब कांचन,
इतर मागासवर्ग गट – शरद किसन वनारसे
अनुसूचित जाती – जमाती गट – जीवन नामदेव शिंदे
भटक्याविमुक्त जाती / जमाती मागास प्रवर्ग गट – धनसिंग दादाराम पोंदकुले