उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेसह राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने स्थगिती दिली होती. मात्र, ती स्थगिती उठवली असून निवडणुकीची मतदान प्रक्रिया रविवारी एक जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुकासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने २९ नोव्हेंबरला स्थगिती दिली होती. हि स्थगिती सहकार खात्याने उठवली असून सदर निवडनुकीसाठी बुधवारी (ता. २१) चिन्ह वाटप होणार आहेत.
संस्थेच्या १३ संचालकासाठी ही निवडणूक होणार असून मतदान १ जानेवारीला सकाळी ९ ते ५ या वेळात घेण्यात येणार असून मतमोजणी आणखी जाहीर करण्यात आली नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी जाहीर केली आहे.