हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक रविवारी (ता. ०१ जानेवारी २०२३) रोजी होणार असून मतमोजणी हि सोमवारी (ता. ०२) होणार आहे.
या निवडणुकीत डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या नेतृत्वाखालील “डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल” रिंगणात उतरला आहे. तर अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या ताब्यातून पतसंस्था आपल्या ताब्यात मिळावी यासाठी सुनील जगताप, अर्जुन कांचन, दत्तात्रय कांचन यांच्या नेतृत्वाखाली “डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल” रिंगणात उतरला आहे.
डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या “डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल” तर विरोधी “डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेलचे प्रमुख सुनील जगताप, अर्जुन कांचन या उमेदवारांत संस्थेची लढाई रंगणार आहे. दरम्यान, १३ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात असुन, “डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल” च्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (ता. २२) तर विरोधी पॅनेल “डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल” च्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (ता. २४) होणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला रंग भरणार आहे.
“डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल” च्या उमेदवारांना “कपबशी” हे चिन्ह मिळाले असून विरोधी पॅनेल “डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल” च्या उमेदवारांना “विमान” हे चिन्ह मिळाले आहे.
दरम्यान, शिरूर येथील डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल गायकवाड यांना प्रचार कार्यात सहभाग घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांच्याकडे अर्जुन रामचंद्र कांचन, सुनील जयवंत जगताप व दत्तात्रय रघुनाथ कांचन यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
पॅनेलनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे :
सर्वसाधारण गट – राजेंद्र ज्ञानोबा कांचन, रामदास पंढरीनाथ चौधरी, भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, कांतीलाल कोंडीराम चौधरी, संजय ज्ञानोबा कांचन, खेमचंद विष्णुदास पुरुसावानी, संजय तुळशीराम टिळेकर, अनिकेत राजेंद्र कांचन, (डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल), प्रकाश जयवंत जगताप, दत्तात्रय रघुनाथ कांचन, अर्जुन रामचंद्र कांचन (डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल)
महिला सर्वसाधारण गट – सारिका जयंत काळभोर, कमल बाळासाहेब कांचन, (डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल), मंदा रघुनाथ बगाडे (डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल),
इतर मागासवर्ग गट – शरद किसन वनारसे (डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल), राजेंद्र प्रभाकर महानुभव (डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल)
अनुसूचित जाती – जमाती गट – जीवन नामदेव शिंदे (डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल), अनिश दिलीप लोंढे (डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल)
भटक्याविमुक्त जाती / जमती मागास प्रवर्ग गट – धनसिंग दादाराम पोंदकुले (डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेल), धनंजय लक्ष्मण मदने (डॉ. मणिभाई देसाई विकास परिवर्तन पॅनेल)