शिरुर : शिरूर तालुक्यातील बेट भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त विशेष उत्साह पाहायला मिळाला. यानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कवठे येमाई, रावडेवाडी, टाकळी हाजी, मलठण, मिडगुलवाडी, सविंदणे या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
कवठे यमाई येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावळेराम उघडे यांनी त्रिशरण व बुद्ध वंदना घेतली. यावेळी किसन हिलाळ, विठ्ठल मुंजाळ, निखिल घोडे, रितेश शहा, पांडुरंग भोर, सुभाष उघडे,गणेश रत्नपारखी, पोपट रोहिले, चित्तरंजन उघडे, सुभाष उघडे, गणेश उघडे, धनंजय उघडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आंबेडकर नगरमधील बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माजी आमदार पोपटराव गावडे, सरपंच अरुणा घोडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब डांगे, किसन हिलाळ, बबन पोकळे यांनी अभिवादन केले. येथील बुद्ध विहार आकर्षक विद्युत रोषणाई तसेच आकर्षक फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते. बाजीराव उघडे, भुषण उघडे व सहकार्यांनी यावेळी त्रिशरण, पंचशील व बुद्ध वंदना घेतली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिद्धार्थ सेवा संघ व भीमशक्ती युवा प्रतिष्ठानचे सावळेराम उघडे, अरुण उघडे, शरद उघडे, सुभाष उघडे, चित्रा उघडे, अमर उघडे, अजय उघडे, कैलास उघडे, गणेश उघडे, संतोष उघडे, कौशल उघडे, अतिश उघडे, रोहित उघडे, गौरव उघडे, रामचंद्र उघडे, प्रवीण उघडे, रितेश उघडे, सतीश उघडे, अक्षय उघडे, अभि उघडे, आदी कार्यकर्त्यांनी संयोजनात महत्त्वाचे योगदान दिले.