गोरख जाधव / डोर्लेवाडी : दिवाळी वर्षांतला मोठा सण, ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, स्वागताची तयारी केली जाते. खरं तर दिवाळी आली की परिसर आकाशकंदील, साध्या रंगीत पणत्या, लुकलुकणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या माळा, मिठाईचे बॉक्सेस, कपड्यांनी भरलेल्या दुकानांच्या शोकेस, रांगोळीचे रंग आणि गर्दीने सजून जातो. दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणानिमित्त आकाश कंदिलाची विक्री करणारे स्टॉल आता सजले आहेत. आकाश कंदिलांमुळे या रस्त्याला एक वेगळंच चैतन्य प्राप्त झालंय.
दिवाळीची चाहूल लागताच बाजारात खरेदी विक्री सुरू झाली असून, बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील डोर्लेवाडी मधील बाजारपेठ आकाश कंदील, फटाके, पणत्या या दिवाळीच्या साहित्याने सजली असून बाजारामध्ये ग्राहकांचेही चांगलीच वर्दळ दिसत आहे. मागील एक दोन आठवड्यापूर्वी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या व महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. याचा परिणाम बाजारपेठेवर झालेला दिसून येत आहे. बाजारात खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
डोर्लेवाडी येथील बाजार पेठ आकाश दिव्याने सुंदर सजलेला आहे. रात्रीच्या वेळी तर हे चित्र आणखीन मनमोहक दिसत आहे. यावर्षी महिलांच्याही खात्यामध्ये लाडक्या बहिण योजनेचे पैसे आल्याने महिलाही छोटी- मोठी खरेदी करताना दिसत आहेत. तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये ७ हजार रुपये व 13 हजार 400 रुपये जमा झाल्याने शेतकरी देखील दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात येताना दिसत आहेत. याचाच परिणाम बाजारात चांगलीच वर्दळ वाढली असून या दिवाळीत चांगला व्यापार होण्याचीही अशा व्यापाऱ्यांना वाटत आहे.
दिवाळी सुरू होण्याअगोदरच बाजारात ग्राहक दिसत आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री होत आहे. थोडेसे भाव जरी वाढलेले असले तरी ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाची दिवाळी चांगली होईल, असे वाटते.
शिवाजी गाडे, व्यापारी
या सरकारणे आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे खरंच गोरगरोब महिलांची दिवाळी ही अत्यंत आनंदाची होणार आहे. सर्वांना या वर्षी दिवाळी हा सन आनंदाने साजरा करता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्यामुळे बारामतीमध्ये हा सन आम्ही लाडक्या बहिणी या वर्षी खूप मोठ्या उत्सहात साजरा करू शकणार आहोत काही कुटुंबात तर दिवाळी सुरु ही झाली आहे खरेदी मोठ्या उत्सहात सुरु झाली आहे ते फक्त अजित पवार यांच्या मुळे यामुळे आम्ही बचत गटातील सर्व लाडक्या बहिणी अजित दादांचे मनापासून आभार मानतो त्यांनी ही योजना सुरु करून आम्हा गोर गरिबांची ही दिवाळी गोड केली.
वैशाली सुतार, अश्विनी दळवी, डोर्लेवाडी