-संतोष पवार
पळसदेव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पळसनाथ विद्यालय पळसदेव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग रोडरेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार (दि.30 ऑगस्ट) रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील 14/16/19 वर्षे वयोगटातील एकूण 60 स्पर्धकांनी सहभाग घेतला. अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : मास स्टार्ट – (मुले) 14 वर्ष गट प्रथम क्रमांक – शर्व वाळके , द्वितीय क्रमांक – दर्शन पवार , (मुली) – प्रथम क्रमांक – वैष्णवी ठिळेकर .17 वर्ष गट – (मुले ) प्रथम क्रमांक -ओंकार गांधले द्वितीय क्रमांक – शौनक महानवर , (मुली )- प्रथम क्रमांक – अनुष्का राऊत , द्वितीय क्रमांक – ध्रुवी शेटे 19 वर्ष गट (मुले)- प्रथम क्रमांक हरिष डोंबाळे, द्वितीय क्रमांक -किशोर गोडे. (मुली) – प्रथम क्रमांक – नेहा फापाळे , द्वितीय क्रमांक – राजेश्वरी पवार. टाईम ट्राईल स्पर्धा – 14 वर्ष गट (मुले) प्रथम क्रमांक – दर्शन पवार द्वितीय क्रमांक – प्रदीप पोगाके . (मुली) – प्रथम क्रमांक – वैष्णवी ठिळेकर. 17 वर्ष गट (मुले) प्रथम क्रमांक – स्वराज्य कराळे , द्वितीय क्रमांक – आर्यन कानडे . (मुली) प्रथम क्रमांक – अनुष्का राऊत द्वितीय क्रमांक – पायल बोचरे. 19 वर्ष गट (मुले) प्रथम क्रमांक – ओंकार ठिळेकर द्वितीय क्रमांक – श्रीशकुमार शिंदे (मुली) प्रथम क्रमांक – अंजली कानडे द्वितीय क्रमांक – नेहा फापाळे .
या सर्व विजेत्या सायकल खेळाडूंची विभागीय शालेय सायकलींग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. यावेळी सर्व विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगिराज काळे, संचालक राजेंद्र काळे, पळसदेवचे सरपंच अंकुशराव जाधव, माजी सरपंच आजिनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काळे, विकास शिंदे, विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव, सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, अशोक जाधव, लक्ष्मण मेटकरी आदिंसह क्रीडाशिक्षक पंच शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.