-बापू मुळीक
सासवड : माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी दिली.
पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ.दिगंबर दुर्गाडे, डॉ.भाऊसाहेब कारेकर, विजय कोलते, सतीश उरसळ, अजित निगडे, जी.के.थोरात, के.एस.ढोमसे या मान्यवरांच्या हस्ते 15 सप्टेंबरला दुपारी अकरा वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सभागृह सासवड याठिकाणी पुरस्कार वितरण संपन्न होणार आहे. सदर पुरस्कार्थींची निवड समितीचे सदस्य मुरलीधर मांजरे, पंकज घोलप, तानाजी झेंडे, राजेंद्र पडवळ, स्वाती उपार, दत्तात्रय रोकडे यांनी केली.
– पुरंदर : इस्माईल सय्यद, शिवाजी कदम, संजय भिंताडे, रमेश जाधव, अबोली भोंगळे, जालिंदर घाटे.
– शिरूर : रोहिदास मांजरे, दिपाली गावडे, कैलास पुंडे, तुषार रुके, प्रकाश चव्हाण.
– हवेली : शेखर शिंदे, ज्ञानदेव वाघमोडे, राहुल कदम, उर्मिला चव्हाण,
– मावळ : रमेश फडतरे, मनोजकुमार क्षिरसागर, संतोष भोसले, बळीराम भंडारे, अनुसया दातीर, भगवान वायसे.
– इंदापूर : अशोक जाधव, लहू निंबाळकर, लक्ष्मण हरणावळ, सुवर्णा कांबळे
– भोर : रविंद्र पवार, चारुशीला निकम, रविंद्र कुंभार, ज्ञानदेव उकांडे, मारुती भोरडे.
– जुन्नर : संजय वाघ, हनीफ शेख, धोंडीभाऊ मानकर, धीरजकुमार सोनवणे, वनिता ढवळे.
– वेल्हे : संजय पगारे, शंकर कामठे, दिपक सोंडकर, वैशाली गायकवाड.
– खेड : अशोक नगरकर, विष्णू काळे, अतुल पवार, पोपट कामठे, अर्चना खोसे.
– आंबेगाव : कैलास देशमुख, अनिल काळे, ज्योती दहीतुले, दत्तात्रय पाटील, प्रकाश चौधरी.
– दौंड : बाळासाहेब पिसाळ, बाबासाहेब सरतापे, रावसाहेब डोंबे, गणेश लोणकर, पूनम शेलार.
– बारामती : दिपक देशमुख, अजिनाथ घोरपडे, शुभांगी सस्ते, धनंजय गायकवाड, सुदाम गायकवाड.
– मुळशी : अनिल काळभोर, दिपाली विधाते, हेमंत चांदणे, शिला पठाण.