राजेंद्रकुमार शेळके
जुन्नर : खटकाळे येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे वितरण पिंपरी-चिंचवड येथील ‘वुई टुगेदर’ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास झाडे होते.
या वेळी वुई टुगेदर फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य नवनाथ मोरे, सामाजिक कार्यकर्ते विलास मोरे, काशिनाथ भवारी, गोपाळ मोरे, ‘एसएफआय’चे जिल्हा समिती सदस्य राजू शेळके, किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, ‘एसएफआय’चे अध्यक्ष अक्षय साबळे, खटकाळे-खैरे गावचे सरपंच बाळू केदारी, माजी सरपंच नथू झाडे, मुख्यमंत्री यू. एच. भोसले, ‘एसएफआय’चे निलेश मोरे, शितल भवारी, सूरज बांबळे, अमित मोरे, रोहित मोरे, योगेश मोडक उपस्थित होते.
या वेळी बोलताना नवनाथ मोरे म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शाळेच्या मागणीनुसार आदिवासी विद्यार्थ्यांनी देखील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन करावे, यासाठी संस्थेने ही पुस्तके दिली आहेत. आमची संस्था स्वतः सभासदांच्या योगदानातून विविध उपक्रम राबवत असते. यापुढे गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मदत देत राहील.”
या वेळी बोलताना विलास मोरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, जेणेकरून आपले नाव मोठे होईल. या वेळी काशिनाथ भवारी म्हणाले की, शिष्यवृत्ती परीक्षा हा स्पर्धा परीक्षांचा पाया आहे. मोठे अधिकारी होण्यासाठी अभ्यास करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मुख्याध्यापक यू. एच. भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो.
या वेळी रामदार झाडे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचे, पालकांचे, गावाचे आणि स्वतः चे नाव उज्ज्वल करण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. लोंढे यांनी केले. या वेळी शिक्षकवृंद एस. वाय. मुंढे, ई. जे. वीर, के. बी. पानसरे, एस. व्ही. थोरात, व्ही. व्ही. भोईर, के. पी. कांडे, कर्मचारी बी. के. साबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.