-बापू मुळीक
पुरंदर : सध्या प्रचलित शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये अध्यापनाची प्रक्रिया चालते. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. शिक्षकांनी अवांतर वाचन करावे. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अध्यापन करण्यासाठी करावा. त्यामधून सुसंस्कारीत पिढी निर्माण होऊन राष्ट्र उभारणीस हातभार लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले.
सासवड (त. पुरंदर ) येथे दरवर्षीप्रमाणे कै.अनुसयाबाई कृष्णाजी जगताप,कै.नारायण कृष्णाजी जगताप, कै.गुणाबाई नारायण जगताप, कै.सुमन हनुमंत जाधव व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान , पुरंदर च्या वतीने पुरंदरच्या प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण प्रसंगी श्री कोलते बोलत होते .
यावर्षी पिसर्वे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वैजयंता बारीकराव खेसे, चांबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक मोहन गोविंद जगताप, पुणे येथील हिरामण बनकर जुनिअर कॉलेजचे सहशिक्षक जितेंद्र ज्ञानोबा देवकर, आतकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका वर्षाराणी अभिराज चव्हाण यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड.दिलीप निरगुडे व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त ॲड.अण्णासाहेब खाडे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे माजी शिक्षण प्रमुख रमेश जगताप, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त शशिकला कोलते, सहसचिव गौरव कोलते, कलाताई फडतरे, कुंडलिक मेमाणे, सुरेश जगताप, हनुमंत जाधव, बारीकराव खेसे, वामनभाऊ कामठे, बाळासाहेब कड, संतोष कोलते, संदीप टिळेकर, अशपाक बागवान आदीसह विविध शिक्षक संघटनांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे कोषाध्यक्ष सुनील लोणकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिन घोलप यांनी तर आभार प्रतिष्ठानचे सहसचिव बंडूकाका जगताप यांनी मानले.