सासवड : कोडीत ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांचे जीवनमान वाढावे व झाडांचे आच्छादन वाढून जमिनीचा कस सुधारावा यासाठी “तेर पॉलिसी सेंटर” च्या वतीने ग्रामपंचायतीला आंबा, सिताफळ व नारळाची २ हजार झाडांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे यांनी दिली.
तेर पॉलिसी सेंटर ही पुणे स्थित आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक काम करणारी संस्था आहे. जंगल वाढवणे, ग्रामीण भागातील विहिरींचे पुनरुज्जीवन करणे तसेच पर्यावरण शिक्षणातून जनजागृती करणे या साठी संस्था अनेक उपक्रम राबवत असते. गाव विकासासाठी नर्सरी व आदिवासी संग्रहालय उभे करण्याचा मानस आहे.
याच उपक्रमांचा भाग म्हणुन संस्थेने फळ झाडांचे वाटप कोडीतचे सरपंच प्रसाद खैरे यांच्याकडे केले. यावेळी उपसरपंच कस्तुराताई खैरे, ग्रामपंचायत सदस्य हेमलताताई जाधव, विशाल कांबळे, बेबीताई खैरे, छाया खैरे, ग्रामसेवक महेश म्हेत्रे, निता तळेकर, ग्रामसंघ अध्यक्षा सविता तळेकर, पर्यावरण तज्ञ ललित राठी, अरविंद पगारे उपस्थित होते. आभार सरपंच प्रसाद खैरे यांनी मानले.