भिगवण : संविधान दिनानिमित्त भिगवण स्टेशन येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. येथील सामाजिक कार्यकर्ते व कायदेतज्ज्ञ अॅड. सूरज खटके यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.
या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. याप्रसंगी बोलताना अॅड. खटके यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, दंडसंहित यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना राज्यघटनेची माहिती असणे गरजेचे आहे. आजची पिढी ही खर्या अर्थाने भारताचे भविष्य आहे. शिक्षणातून त्यांना प्रेरणा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिगवणच्या सरपंच दीपिका क्षीरसागर होत्या. या वेळी सचिन बोगावत, प्रा. तुषार क्षीरसागर, जावेद शेख, सुरेश बिबे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ग्रापपंचायत सदस्य आबा काळे, निर्मला पांढरे, अण्णा धवडे, आप्पासाहेब गायकवाड, प्रदीप वाकसे, जमीर शेख, विठ्ठल म्हस्के, राहुल चोपडे, संतोष शेंडगे, शाहरुख शेख, महेंद्र मदने, अविनाश गायकवाड, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भारत गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वणवे यांनी केले. तर आभार राहुल लंबाते यांनी मानले.