सासवड : गुरोळी (ता. पुरंदर) भारत फोर्ज लिमिटेड पुणे यांच्या वतीने गुरोळी गावातील शेतकऱ्यांना १ हजार ७०० आंब्याच्या रोपांची वाटप करण्यात आली. यावेळी प्रत्येक शेतकऱ्याला पाच रोपे देण्यात आली. अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते ऊन यापासून निसर्गाचा होणारा रास कारणीभूत मानला जातो.
यावर वृक्षारोपण हा अतिशय प्रभावी उपाय आहे. व पर्यावरणाबरोबरच शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढावे ही काळाची गरज ओळखून भारत फोर्ज लिमिटेड, पुणे यांच्या वतीने दरवर्षी शेतकऱ्यांना आंब्याच्या रोपाची वाटप केली जाते.
तसेच यावर्षी भारत फोर्स चे अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी व सी एस आर चे प्रमुख डॉक्टर लीना देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यामधील ३० हजार रोपांची वाटप केली जाणार आहे, असे मत जलदूत सागर तात्या काले यांनी मांडले.
यावेळी गुरोळी गावचे माजी सरपंच रामचंद्र यशवंत खेडेकर, राष्ट्रवादी गटाचे पुरंदर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष मनोहर खेडेकर, जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष प्रवीण खेडेकर व शेतकरी उपस्थित होते.