भिगवण,ता.15: भिगवण ग्रामपंचायत अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या अपंग/दिव्यांग बांधवांना अपंग कल्याण निधी अद्याप पर्यंत वाटप करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील काही युवकांनी ग्रामपंचायतीस (दि. 15 रोजी) निवेदन दिले असून ग्रामपंचायतने उत्पन्नाच्या 5% अंध,अपंग,दिव्यांग कल्याण निधी खर्च करण्याची तरतूद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वनिधीतील 5 % निधी हा दिव्यांगांसाठी वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाच्या योजनांवर खर्च केला जाणे गरजेचे आहे. चालू आर्थिक वर्ष (2024-25) संपत आले तरीही भिगवण ग्रामपंचायतने सदरच्या निधीचे वाटप केले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस निवेदन देत येत्या 8 दिवसात अपंग कल्याण निधीचे वाटप करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.
यावेळी आप्पासाहेब गायकवाड,प्रा.तुषार क्षीरसागर, अॅड.सुरज खटके, अमर धवडे, किशोर पोंदकुले, आकाश उंडाळे, कपिल लांडगे उपस्थित होते.
सरपंच निवड प्रक्रियेमुळे निधी वाटपासाठी विलंब झाला आहे, मार्च अखेरीस लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात येईल.
-दत्तात्रय परदेशी,( ग्रा.प. अधिकारी,भिगवण)
नवीन सरपंच निवड होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून त्यामुळे विलंब होण्याचे फक्त निमित्त आहे. परंतु, सध्या ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आहे, निधीची कमतरता जाणवत आहे त्यामुळे देखील विलंब होत आहे.
-ॲड.सुरज खटके (ग्रामस्थ भिगवण)